Weather Update : राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट; वाचा… कुठे बरसणार पाऊस?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात वातावरणात मोठा बदल दिसून (Weather Update) येत आहे. कोकण आणि किनारपट्टीवरील परिसर उकाड्याने त्रस्त आहे. तर लगतच्या सह्याद्री पर्वत रांगेलगतच्या पूर्वेकडील भागांसह मराठवाड्यात पाऊस बरसत आहे. तर राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात खाली आहे. अशातच आता मुंबईसह कोकण परिसरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याउलट दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पाऊस (Weather Update) होऊ शकतो. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना इशारा (Weather Update Today 17 April 2024 Maharashtra)

हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, आज कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेच्या इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज (ता.17) आणि उद्या (ता.18) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये या दोन दिवसांच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

कमाल तापमानात वाढ

दरम्यान मागील 24 तासांमध्ये राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून, काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 हुन वरती सरकल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील मालेगाव या ठिकाणी उच्चांकी 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे, धुळे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, वाशीम या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार पोहचला आहे. मंगळवारी केवळ राज्यातील मालेगाव या ठिकाणी तापमान 40 हुन अधिक होते. मात्र, गेल्या 24 तासांत जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे सध्या एकीकडे उष्णेतेची लाट तर दुसरीकडे पाऊस असे संमिश्र वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!