राज्यात गारठा वाढला; तापमानात चढ-उतार कायम राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मंगळवारी किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. राजस्थानातील चूरू येथे मंगळवारी देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान स्थिती

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली निवळून गेली आहे. तर दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ असलेले कमी दाब क्षेत्र हळूहळू वायव्येकडे सरकत आहे. उद्यापर्यंत ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

कुठे किती तापमान ?

मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.३ (११.४), जळगाव ३०.६ (१२.०), धुळे ३०.० (१०.०), कोल्हापूर ३१.८ (१६.७), महाबळेश्वर २६.५(१३.२), नाशिक ३०.१ (१२.६), निफाड २९.६ (१०.२), सांगली ३२.४ (१४.६), सातारा ३०.३(१३.९), सोलापूर ३३.२ (१६.५), सांताक्रूझ ३३.५(२०.५), डहाणू ३२.९ (१९.५), रत्नागिरी ३५.० (१९.३), औरंगाबाद ३०.८ (१०.४), नांदेड २९.८ (१३.८), परभणी ३०.३ (१३.१), अकोला ३२.२ (१४.४), अमरावती ३१.४ (१३.८), बुलढाणा ३०.२ (१३.७), ब्रह्मपूरी ३२.२ (१३.८), चंद्रपूर २८.२ (१४.२), गडचिरोली २९.०(१२.२), गोंदिया ३०.५(१०.५), नागपूर २९.४ (१२.४), वर्धा २९.०(१३.०), यवतमाळ २८.५ (११.५).

error: Content is protected !!