हिमालयात हिमवृष्टी : नागपूरात नीचांकी 7.8 तर मराठवाड्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंडीने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  किमान तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे हंगामातील नीचांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  आज दिनांक 21 रोजी राज्यात गारठा वाढणार असून विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.  या भागात काही ठिकाणी तापमान 10 अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरले आहे. नागपूर, अमरावती येथे थंडीची लाट आली असून गोंदिया, वर्धा, निफाड आणि जळगाव येथे तापमानात मोठी घसरण झाल्याने हुडहुडी वाढली आहे. राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान 29 अंश आणि पेक्षा खाली गेले असून त्यामध्ये चढउतार सुरू आहेत.  दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका कमी झाला असल्यानं हवेत गारवा जाणवतो आहे. सोमवारी दिनांक 20 सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रूझ येथे सर्वाधिक 32.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट
हिमालयात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर आणि वायव्य भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. सोमवारी दिनांक 19 रोजी राजस्थानच्या चुरू आणि सिकार इथं देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी   0.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पंजाब,हरियाणा, चंदिगड, दिल्ली, राजस्थान,मध्यप्रदेश आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता पहाटे दाट धुके पसरणार असून या भागात थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे.

कमी दबाचे क्षेत्र ठळक
बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताच्या जवळ तयार कमी दाबाचे क्षेत्र आणखी ठळक झाले आहे. पूर्व आणि ईशान्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली दक्षिण अंदमान समुद्र आणि सुमात्राच्या किनाऱ्याजवळ होते. त्यामुळे अंदमान निकोबार बेटांवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!