Weather Update : पुढच्या 2 तासांत ‘या’ जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस, सॅटेलाईट फोटोवरून हवामान अभ्यासकांनी जारी केला अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update : राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊसामुळे बऱ्याच ठिकाणी जीवितहानी झाली आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार आज देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी काही महत्वाचं काम असेल तरचं घरातून बाहेर पडावे असं आव्हान देखील करण्यात आले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

पुढच्या 2 तासांत ‘या’ जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस

आज संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी सॅटेलाईटमधून टिपलेला आज सकाळचा एक फोटो ट्विट केला आहे. यानुसार पुणे (Pune Rain), नागपूर वगळता सर्वत्र ढग दाटून आल्याचे दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ तसेच विदर्भाला लागून असलेले मराठवाड्यातील काही जिल्हे यासह रायगड, गोवा आदी भागात ढगाळ वातावरण असून पुढील काही तासांत येथे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

हवामान खात्याने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात, मराठवाड्यात आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गसह कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अनेकदिवस दडी मारून बसलेल्या पावसाला बुधवारपासून सुरवात झाली आहे. यामुळे पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालं असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. (Havaman Andaj )

नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस

दरम्यान, मागच्या काही दिवसापासुन मराठवाड्यत पावसाने दडी मारली होती. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या होत्या मात्र आता पावसाने आता मराठवाड्यात देखील थैमान घातले आहे. या ठिकाणीही मुसळधार पाऊस चालू आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे

असा मिळवा तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावामधील अचूक हवामान अंदाज मिळवायचा असेल तर आजच मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे app डाऊनलोड करून घ्या. येथे तुम्हाला हवामान अंदाजासोबत रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे आदी सेवा अगदी मोफत देण्यात येतात. तुम्ही देखील नक्कीच याचा फायदा घ्या. या ॲप मध्ये तुम्हाला शेतीविषयक बऱ्याच गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळेल त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.

error: Content is protected !!