हवामान अंदाज : येत्या 4-5 दिवसात राज्यातील थंडी कमी होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात थंडी मध्ये वाढ झाली आहे. तसेच दिवसातील तापमानात देखील घट होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान 12 अंशांच्या खाली घसरले आहे. दरम्यान राज्यात येत्या चार-पाच दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच हिवाळ्याची तीव्रता देखील कमी होण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात येत्या चार-पाच दिवसात तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच त्याची तीव्रता देखील कमी असेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली असल्याची त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान आज सकाळी दिनांक 24 डिसेंबर रोजी नांदेड येथे 13.8 जालना येथे 13.3,सोलापूर येथे 13,परभणी 13.5,कोलाबा इथं 20,सांताक्रूझ 18.4 औरंगाबाद येथे 13.5, कोल्हापुर 16.6, पुणे येथे 12.4, रत्नागिरी येथे 17.1, डहाणू इथं 17.3, जळगाव 10.5, जेऊर 12, मालेगाव 13.2, ठाणे येथे 20.2,. उस्मानाबाद येथे 13.9, नाशिक 12, बारामती 13.3, सातारा येथे 15.2,माथेरान 16.1 आणि सांगलीत 15.2 तर महाबळेश्वर येथे 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत सकाळच्या वेळेत गारवा जाणवतो आहे. आज सकाळी दिनांक 24 डिसेंबर रोजी पुण्यात नोंदवल्या गेलेल्या तापमानानुसार शिरूर येथे सर्वात कमी 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज जास्तीत जास्त तापमान पुण्यामध्ये जवळपास 30 अंशांपर्यंत असेल अशी माहितीही हवामान तज्ञ केस होसाळीकर यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!