Weather Update : राज्यात बहुतांशी ढगाळ वातावरण; ‘या’ भागाला आज यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे तर काही भागात ढगाळ हवामान आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून वर्तवल्या अंदाजानुसार आज (२६) पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

हवामान स्थिती

उत्तर पंजाब आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून आग्नेय बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची (Weather Update) स्थिती तयार झाली आहे. मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालियापर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल न झाल्याने रविवारी (ता. २५) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती.

आज या भागाला यलो अलर्ट

दरम्यान आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

error: Content is protected !!