Weather Update : राज्यात ‘या’ भागात पाऊस सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update : आज दिवसभरात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात कमी दाबाची रेषा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत जात आहे. पुढील दोन दिवस राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासात विदर्भाव्यतिरिक्त उर्वरित भागात पाऊस सक्रिय असेल तसेच संपूर्ण राज्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सातारा, सांगलीला पाऊसाचा ठेंगा

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरला मात्र पाऊसाने ठेंगा दाखवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांत पाऊसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असून उर्वरित भागात शेतीची दयनीय अवस्था झाली आहे.

रात्री उशिरा हवामान विभागाने शेअर केलेल्या सॅटेलाईट फोटोमध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात विजांचा गडगडाट पाहायला मिळाला. तसेच मध्य भारत, पश्चिम तट आणि मध्य, दक्षिण भारतात ढगाळ वातावरण दिसून आले. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊसाची नोंद झाल्याने दुष्काळाचे सावट दिसत आहे.

पुढील 2 दिवस कोकण गोवा व विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 72 तासानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. सातारा, वाई, महाबळेश्वर या भागात बराच काळ पावसाची संततधार झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र उजनी धरणामध्ये फक्त 23 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे उजनी धरण भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. अकोल्यात पावसाने हजेरी लावली असून झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान नागपूर हवामान खात्याने तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे.

यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले

यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले असून नाल्याच्या पुराचे पाणी शेतात गेल्यामुळे पिकांचे व शेताचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. धरणक्षेत्रातील प्रकल्पामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.

error: Content is protected !!