Weather Update : राज्यात थंडीचा कडाका; तामिळनाडूमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. राज्यात पुढील सहा दिवस हवामान कोरडे राहणार असून, उत्तरेकडील राज्यांमधील वाढलेल्या थंडीचा परिणाम या कालावधीत राज्यात पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी महाबळेश्वरपेक्षा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी (Weather Update) पडल्याची पाहायला मिळत आहे.

विदर्भ गारठला (Weather Update Today 20 Dec 2023)

सध्यस्थितीत राज्यात सर्वाधिक थंडीची तीव्र लाट (Weather Update) विदर्भात पाहायला मिळतीये. सर्वसाधारणपणे महाबळेश्वरमध्ये राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद होत असते. मात्र यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्या कारणाने महाबळेश्वरपेक्षाही (12.6 अंश सेल्सिअस) विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मागील दोन ते तीन दिवसांत 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमान कमी पाहायला मिळत आहे. महाबळेश्वर येथे आज 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भांतील गोंदिया (9.0), यवतमाळ (9.0), नागपूर (9.4), वाशीम (10.0), गडचिरोली (10.6), चंद्रपूर (11.0), वर्धा (11.4), अमरावती (12.5), बुलडाणा (12.8), अकोला (13.5) येथे महाबळेश्वरपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने या आठवड्यातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्यातरी कडाक्यापासून विदर्भातील नागरिकांची सुटका शक्य होणार नसल्याचे अधोरेखित झाले आहे.

तामिळनाडूमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच

महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडलेली असतानाच दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये मात्र पावसाचा धुमाकूळ सुरूच (Weather Update) असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. तर पूरस्थितीमुळे त्या ठिकाणी रेल्वे सेवेसह राज्यातील दळणवळण सेवाही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आजही तामिळनाडूमधील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे देशात कुठे थंडीची लाट तर कुठे पूरस्थिती पाहायला मिळत आहे.

रब्बी पिकांना पोषक वातावरण

या वर्षीच्या ‘एल-निनो’ प्रभावामुळे ईशान्य मॉन्सून दक्षिण भारतातच मर्यादित असल्याचे तामिळनाडूच्या पूरस्थितीवरून (Weather Update) पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या आकाश निरभ्र असून, थंडीचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळतोय. ‘मॅन-दौंस’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात थंडीचे कमी प्रमाण पाहायला मिळाले होते. मात्र सध्या राज्यात पडलेली कडाक्याची थंडी ही रब्बी हंगामासाठी नक्कीच पूरक व जमेची बाजू समजावी लागेल, असे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!