Weather Update : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; वाचा तुमच्या जिल्ह्यातील तापमान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात थंडीमध्ये वाढ (Weather Update) होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट (Weather Update) झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमान 15 अंशांहून घसरल्याचे दिसून येत आहे. आज नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे (13.3) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी कायम (Weather Update) राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 13.3 अंश तर पुण्यात 14 अंश किमान तापमानाची (Weather Update) नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्येही 14.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत 15.5 अंशांची नोंद झाली. तर विदर्भात नागपूर 14.4 अंश तर गोंदियात 13.2 अंशांपर्यत तापमानात घट नोंदवली गेली आहे. उर्वरित राज्यात अद्यापही गुलाबी थंडीची प्रतिक्षा आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारठा वाढला असून, तिकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर राज्यात या आठवड्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

महत्वाच्या ठिकाणचे आजचे तापमान (Weather Update Today Maharashtra)

आज शुक्रवारी (ता. 15) राज्यातील काही भागांमधील सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) काहीसे असे आहे. पुणे 31.5 (16.3), जळगाव 34.7 (15.2), कोल्हापूर 30.6 (20.1), महाबळेश्वर 26.6 (16.0), नाशिक 32.0 (14.8), निफाड 32.4 (13.3), सांगली 30.4 (18.8), सातारा 31.6 (17.1), सोलापूर 31.9 (18.6), सांताक्रूझ 36.4 (22.6), डहाणू 33.3 (21.4), रत्नागिरी 34.4 (22.6), छत्रपती संभाजीनगर 32.2 (13.4), नांदेड 32.4 (17.6), परभणी 32.0 (16.0), अकोला 34.1(16.6), अमरावती 31.8 (17.2), बुलढाणा 32.0 (16.4), ब्रह्मपूरी 33.0 (18.0), चंद्रपूर 31.2 (16.6), गडचिरोली 31.6 (16.2), गोंदिया 31.2 (16.4), नागपूर 31.4 (16.3), वर्धा 31.8(16.9), वाशीम 33.8(16.8) यवतमाळ 34.5 (14.5).

error: Content is protected !!