Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशातील अनेक भागांमध्ये म्हणावी अशी थंडी पडणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता याचा रब्बी पिकांना फटका बसणार आहे.

हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, देशातील बऱ्याच भागांमध्ये यावर्षी कडाक्याची थंडी (Weather Update) ही अभावानेच पाहायला मिळू शकते. यामागे प्रमुख कारण म्हणजे एल निनोची सक्रियता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांच्या काळात देशातील अनेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमान हे सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. देशात पुढील मान्सून हंगाम सुरू होईपर्यंत एल निनोचा प्रभाव हा पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. मात्र या तीन महिन्यांच्या काळात सामान्य हिवाळ्याच्या तुलनेत 0.5 डिग्री सेल्सियसने तापमान अधिक असणार आहे. त्यामुळे या उष्णतेचा रब्बी पिकांवर, विशेषत: गव्हावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

डिसेंबरमधील पावसाचे प्रमाण (Weather Update Dec to Feb IMD)

दरम्यान, 1901 नंतर देशातील नोव्हेंबर 2023 या महिन्यातील सरासरी कमाल आणि किमान तापमान हे तिसऱ्यांदा सर्वाधिक राहिले आहे. डिसेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात सर्वसाधारणपणे 15.9 मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यात देशाच्या उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भागात आणि दक्षिण द्वीपकल्पीय पट्ट्यात यावर्षी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील पावसाचे प्रमाण हे सामान्य असणार आहे. असेही आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे. दरम्यान, सध्यस्थितीत बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमी दाब तयार झाला आहे. तो चक्रीवादळात रूपांतरित होणार असून, 4 डिसेंबरच्या संध्याकाळी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम आणि चेन्नई दरम्यान किनारपट्टीवर धडकेल, असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

error: Content is protected !!