Weather Update : दिवाळीपूर्वी पाऊस धुमाकूळ घालणार; ‘या’ जिल्ह्यांना इशारा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसात राज्यातील हवामानात (Weather Update) मोठा बदल पाहायला मिळतोय. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीस गारवा असा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD ) व्यक्त करण्यात आली आहे.

कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता? Weather Update

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दक्षिणेत हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी पुढील चार ते पाच दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि आसपासच्या परिसरात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान दक्षिणेकडील केरळ, आंध्रप्रदेश, रायलसीमा, कर्नाटकचा किनारी भाग, दक्षिण कर्नाटक, कराईकल, आणि तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचेही हवामान खात्याने (Weather Update) म्हटले आहे.

शेतकरी मित्रानो, तुमच्या गावात हवामान नेमकं कस असेल? पाऊस पडणार का? हे मोबाईलवर जाणून घेण्यासाठी आजच Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला सलग ४ दिवसांचा हवामान अंदाज अगदी मोफत मध्ये समजतो. याशिवाय सातबारा उतारा, जमीन मोजणी, सरकारी योजनांचा लाभ, रोजचा पिकांचा बाजारभाव यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ घरबसल्या घेता येतोय. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

यावर्षी राज्यात पावसाचे असमान प्रमाण पाहायला मिळाले. काही भागात अतिवृष्टी झाली, तर काही भागांमध्ये पुरेसा पाऊसच पडला नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच ज्या भागात अपुरा पाऊस पडला, त्या भागात आतापासूनच पाणीटचांई जाणवू लागली आहे. तर ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे देखील मोठी नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने ऊसतोडणीसह खरिपातील पीक काढणीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!