Weather Update : ‘या’ दोन राज्यात पावसाचा धुमाकूळ; ढगफुटीमुळे शाळा, कॉलेज बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. कुठे कडाक्याची थंडी (Weather Update) तर कुठे पावसाचे थैमान असे संमिश्र हवामान सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या कडाक्याची थंडी पडलेली असताना दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मात्र ढगफुटी पावसाने थैमान घातले आहे. या दोन राज्यांमधील काही भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस (Weather Update) झाला आहे. असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण तामिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये झालेल्या ढगफुटी पावसाने (Weather Update) थैमान घातले आहे. यामध्ये प्रामुख्याने दक्षिण तामिळनाडूच्या थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात मागील 24 तासांत 400 ते 950 मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यामध्ये कयालपट्टीणममध्ये 946 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोबतच शेजारील राज्य असलेल्या केरळमध्ये देखील पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात केरळमधील अनेक ठिकाणी अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

शाळा, कॉलेज बंद (Weather Update Heavy Rain In Tamil Nadu, Kerala)

दरम्यान, आज देखील भारतीय हवामान विभागाने केरळसह तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा (Weather Update) इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी भरलेले आहे. त्यामुळे सार्वधिक पाऊस झालेल्या तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थूथुकुडी आणि थेनकाशी या चार जिल्ह्यामध्ये आज शाळा, कॉलेज यांनी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसले आहे. तर सर्व रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू असतानाच महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानात मोठी घट झाली आहे. प्रामुख्याने विदर्भासह मराठवाडा,मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला (Weather Update) असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशांच्या खाली आला आहे.

error: Content is protected !!