Weather Update : 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम; वायव्येकडे पुन्हा कमी दाब क्षेत्र तयार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “गेले दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह (Weather Update) झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने, शेतकरी पुरते हवालदिल झाले आहे. अशातच आता पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेले पावसाचे वातावरण सध्या पूर्णपणे निवळले असून, पुढील दोन दिवसांत राज्यातही पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

किमान तापमानात वाढ (Weather Update In Maharashtra)

गेले दोन दिवस राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह झालेल्या पावसामुळे किमान तापमानात (Weather Update) मोठी वाढ झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 5 अंश सेल्सिअस तर धुळे या ठिकाणी असलेला 10 अंशाखालील तापमानाचा पारा वरती सरकला आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील निफाड येथे 13.2 तर धुळे येथे 12.6 अंश सेल्सिअस इतके निच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जाणवणारी थंडी सध्या काहीशी कमी होऊन, दमट हवामान पाहायला मिळत आहे.

कमाल तापमानातही अल्प वाढ

याउलट पावसाच्या वातावरणानंतर मंगळवारी (ता.27) राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाची ताप वाढलेली पाहायला मिळाली. मागील 24 तासांमध्ये सोलापूर या ठिकाणी राज्यातील 35.8 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. तर पुणे येथे (35.1), जळगाव (35.2), अकोला (35.0) या तीन जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा 35 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळाले. याव्यतिरिक्त राज्यातील अन्य भागांमध्ये 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले आहे.

वायव्येकडे पुन्हा कमी दाब क्षेत्र तयार

दरम्यान, अरबी समुद्रामार्गे वायव्येकडील अफगाणिस्तान ते पाकिस्तान आणि राजस्थानपर्यंतच्या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी 1 मार्च ते 3 मार्च 2024 या कालावधीत देशातील उत्तरेकडील राज्यांसह मध्य भारतात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राचा सध्या तरी महाराष्ट्रावर कोणताही परिणाम दिसून येणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!