Weather Update : आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम; राज्यभरात पिकांचे मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर कमी दाबाचा पट्टा (Weather Update) सक्रिय झाला आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्रात वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज (ता.27) राज्यातील बुलढाणा, अकोला, वाशीम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा येलो अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. तसेच ऊत्तर महाराष्ट्रातही आज गारपीट होणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) सांगण्यात आले आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील अन्य भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Weather Update) देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी राज्यभर झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहे. नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नांदेड, पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

निफाडमध्ये द्राक्ष पिकास फटका (Weather Update 27 Nov 2023)

द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये गारपिटीने द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. तर नगर जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसाचा पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. तिकडे हिंगोली जिल्ह्यात शेतातील कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नंदुरबारमधील लाल मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, गारपिटीमुळे राज्यातील लाल कांद्याचे उत्पादन कमी होऊन भविष्यात पुन्हा कांदा टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुजरातमध्येही पावसाचा कहर

तर शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्येही रविवारी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. गुजरामध्ये वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची आकडेवारी प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे. असे त्यांनी म्हटले आहे. तर राजस्थानमध्येही रविवारी अनेक भागांमध्ये गारपिटीसह पाऊस झाला आहे.

error: Content is protected !!