Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता; ‘पहा’ तुमच्या भागातील परिस्थिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही भागांमध्ये पावसाने उघडीप (Weather Update) घेतली आहे. मात्र, येत्या 48 तासात राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. तर राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पाहायला मिळणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढील 48 तासात प्रामुख्याने विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुर जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी (Weather Update) पाहायला मिळणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

चक्रिय स्थिती कायम (Weather Update 29 November 2023)

सध्या आग्नेय राजस्थान आणि पश्चिम महाराष्ट्रावर असणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळे या भागातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, श्रीलंकेच्या किनारपट्टी भागामध्ये चक्रिय वारे कायम असल्यामुळे त्याचे भारताच्या किनारपट्टी भागापर्यंत काय परिणाम दिसतात? हे पाहणे महत्वाचे असेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर अवकाळी पावसामुळे राज्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, 161 जनावरे दगावली आहेत.

error: Content is protected !!