Weather Update : विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ (Weather Update) दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. नेल्लोर ते कावली या भागादरम्यान बापटला जिल्ह्याजवळ चक्रीवादळाने (Weather Update) ताशी 90 ते 100 कि.मी. वेगाने आंध्रचा किनारा ओलांडल्याची माहिती भारतीय हवामानशास्र विभागाने दिली आहे. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडील ओडिशामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत असून, या राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तसेच पुढील चार दिवस हवामान कायम राहणार असून, जास्त बदल (Weather Update) होण्याची शक्यता नाही. राज्यातील पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान अंशतः ढगाळ राहणार असून, विदर्भ आणि मराठवाड्यात बुधवारी (ता. 6) आणि गुरुवारी (ता. 7) मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुख्यतः चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 8 डिसेंबरपासून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असून, येत्या दोन दिवसांत तापमानात काही अंशांची घसरण होऊन थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

तमिळनाडूसह आंध्रप्रदेशात पूरस्थिती (Weather Update Today 6 Dec 2023)

चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, तमिळनाडूतील पूनामेल्ली (जि. तिरुवेल्लूर) येथे 340 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तमिळनाडूसह, आंध्र प्रदेश, रायलसीमामध्ये अनेक ठिकाणी 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, नागापट्टिनम, कुड्डालोर आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे चेन्नईतील बहुतांश भाग पाण्याखाली बुडाला आहे. तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

error: Content is protected !!