Weather Update : पुढील 6 दिवस कोणत्या जिल्ह्यात कसे हवामान राहणार? जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून अवकाळी पावसाने नकोसं करून ठेवलं आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर देखील परिणाम झालेला पहायला मिळतो. यामुळे शेतकरी आता द्विद मनस्थितीत अडकला आहे. अशातच राज्यातील काही भागात कधी पाऊस पडतो, तर कधी कोरडे हवामान पहायला मिळते. अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार गेला असून, विदर्भ, आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक आहे.

आज (ता.११) मे या दिवसापासून पुढील सहा दिवस म्हणजेच ११ मे ते १६ मे पर्यंत राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांना पावसापासून दिलासा मिळाला आहे. मात्र तापमानात वाढ झाली असून उकाड्यात देखील वाढ झाली आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काढणीला आलेली कांदा, ज्वारी, भुईमूग अशी पिकं ११ मे ते १६ मे दरम्यान लवकर काढून घ्यावीत. नाहीतर पुन्हा १७ मे पासून विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस असण्याची शक्यता आहे.

आपल्या गावात ऊन असेल की पाऊस; जाणून घेण्यासाठी हे नक्की करा

राज्यात कोणत्या ऋतूत काय होईल याचा आता नेम राहिला नाही. सध्या राज्यात पाऊस पडत आहे. यामुळे निसर्गचक्र बदलू लागल्याचं पहायला मिळते. यामुळे आता कोणत्या गावात किती पाऊस पडला आणि किती ऊन पडले. हे जाणून घेणं आता खूपच सोपं झालं आहे. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. यासाठी सुरुवातीला गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. या ॲपद्वारे आपल्याला दररोजच्या बदलत्या हवामानाचे अपडेट्स सहज मिळू शकतात.

११ मे ते १६ मे हा कालावधी विवाह सोहळ्यासाठी सकारात्मक तर काही ठिकाणी नकारात्मक

११ मे ते १६ मे या कालावधीत हवामान कोरडे राहणार असल्याने लग्नसराईसाठी हा कालावधी सकारात्मक आहे. या कालावधीत पावसाची अनुपस्थिती असल्याने याचा फायदा लग्न सोहळ्यातील वर – वधू आणि वर्हाडी मंडळींना होणार आहे. असे असले तरीही या काही दिवसात राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर कोकणभागात रायगड, रत्नागिरी या ठिकाणी अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. यामुळे ११ ते १६ मे हे दिवस मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आणि कोकणभागातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी नकारात्मक राहतील.

error: Content is protected !!