Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे . मागील २-३ दिवसांपासून महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी धुव्वाधार पाऊस पडत असून पावसाचा हा जोर आणखी ३ ते ४ दिवस अशाच प्रकारे पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४ दिवसातही महाराष्ट्रात धो- धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी पट्ट्यात विजेच्या गडगडाटसोबत सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता आहे. तर धुळे नांदुरबार, जळगाव, नाशिक या उत्तर महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटसोबत रिमझिम पाऊसाचा अंदाज (Havaman Andaj) वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजेच पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कतेचा काळजी घेण्याची गरज आहे. या सर्व जिल्ह्याना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

शेतकरी मित्रानो, तुमच्या गावात पाऊस पडणार आहे कि नाही हे अचूकपणे जाणून घ्यायचं असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा आणि सलग ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज जाणून घ्या. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशु खरेदी- विक्री अशा अनेक सुविधांचा लाभ घेता येतोय. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि फुकट मध्ये सर्व सुविधांचा लाभ घ्या

मराठवाड्यात कस असेल वातावरण- Weather Update

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज असून हलक्या सऱ्या कोसळण्याची शक्यता आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

विदर्भाच्या हवामानाबद्दल (Weather Update) सांगायचं झाल्यास, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता आहे. या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा याठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आला असून रिमझिम पावसाची शक्यता आहे.

error: Content is protected !!