Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच आता येत्या 48 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे एकाच वेळी तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ‘दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना पावसाचा इशारा’ या मथळ्याखाली हॅलो कृषीकडून बातमी प्रसारित करण्यात आली होती. यात हवामान विभागाने (Weather Update) पावसाचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून, आज बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची अचानक तारांबळ उडाली असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकरी मित्रानो, तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? वातावरण कस असेल हे अचूकपणे जाणून घ्यायचं असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सलग ४ दिवसांचा हवामान अंदाज अगदी अचूकपणे समजतो. याशिवाय सातबारा उतारा, शेतजमीन, रोजचा बाजारभाव, पशु खरेदी -विक्री यांसारख्या असंख्य सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

मराठवाड्यात सुद्धा पावसाची शक्यता – Weather Update

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही येत्या दोन दिवसात पाऊस होईल. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पीक काढणीची कामे सुरू आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कर्नाटकात पूरस्थिती-

दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून कर्नाटकात मुसळधार पाऊस सुरू आहे. राजधानी बंगळुरूमध्ये सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय कर्नाटकातील अन्य भागातही पावसाचे पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना पाण्यातून रस्ता काढावा लागल्याने अनेक भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!