Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर वाढणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कुठे थंडी, कुठे ऊन तर बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही भागांमध्ये हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

पुढील पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण राहणार असून, पूर्व विदर्भातील अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता नसून, त्या ठिकाणी थंडीमध्ये काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे. याशिवाय राज्यातील अनेक भागांमध्येही या काळात कमाल तापमानात घट होऊन, गारठा वाढण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

या राज्यांनाही इशारा (Weather Update 9 Dec 2023)

दरम्यान, अरबी समुद्रात नव्याने एक कमी दाब क्षेत्र तयार होत असून, ते पश्चिमेकडे सरकणार आहे. या दाब क्षेत्रामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये मिचॉन्ग चक्रीवादळाचा प्रभाव तितकासा कमी झाला नसल्याने पुढील काही दिवस सिक्कीम, पश्चिम बंगालमधील काही भागांसह नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

किमान तापमानात घट होणार

उत्तरेकडील राज्यांमधून महाराष्ट्राकडे येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे, अनेक भागांमध्ये सकाळच्या सुमारास धुके पाहायला मिळत आहे. या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथे राज्यातील निच्चांकी 14.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!