Weather Update : 48 तासांत ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; धुळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारत विशेषतः तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) सुरूच आहे. ज्यामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, पूरस्थितीमुळे त्या ठिकाणी आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यातच पुढील काही दिवस दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता कायम (Weather Update) आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही मात्र थंडीचा कडाक्यामध्ये वाढ (Weather Update) होऊन, कोरडे वातावरण पाहायला मिळणार आहे. तर उत्तरेकडील राज्य असलेल्या पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशमधील पहाडी राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तर देशातील उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळू शकते. असेही भारतीय हवामानशास्र विभागाने म्हटले आहे.

दिल्लीमध्ये हलक्या पावसाची शक्यता (Weather Update 22 Dec 2023)

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्येही पुढील दोन दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडच्या काही भागात 23 आणि 24 डिसेंबर रोजी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. दरम्यान, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी पाऊस पडल्यानंतर शनिवारपासून तापमानात वाढ होऊ शकते. 23 डिसेंबर रोजी किमान तापमान 9 अंशांपर्यंत तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. असेही भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

धुळे येथे निच्चांकी तापमान

दरम्यान, उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट पसरली असून, उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात (Weather Update) मोठी घट झाली आहे. आज (ता.22) धुळे येथील कृषी महाविद्यालयात यावर्षीच्या हंगामातील निच्चांकी 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी कायम आहे. तर मराठवाडा, उर्वरित मध्य महाराष्ट्रात गारठा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!