हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर (Weather Update) वाढला असून, अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यातच आता येत्या 24 तासांमध्ये देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये तर लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
किमान तापमानात घट (Weather Update Today 17 Dec 2023)
सध्यस्थितीत उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी (Weather Update) पसरली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीच्या अनेक भागात किमान तापमान 4 ते 8 अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे देशातील नीचांकी 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील या राज्यांमधून येणाऱ्या थंडीमुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 13 अंशांच्या खाली घसरला आहे. गारठा वाढू लागल्याने जेऊर पाठोपाठ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 11 अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे 11.5 अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 11.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
या राज्यांना इशारा
असे असतानाच एकीकडे थंडी तर दुसरीकडे पाऊस असे काहीसे संमिश्र वातावरण (Weather Update) पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 18 तारखेपर्यंत केरळ तमिळनाडू, माहे आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये येत्या 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील हलका पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.