Weather Update : राज्यातील ‘या’ भागांत पावसाला पोषक वातावरण; आयएमडीची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये थंडीमध्ये मोठी घट (Weather Update) झाली आहे. त्यातच आता राज्यातील तापमानात काहीशी वाढ होणार असून, अनेक भागांमध्ये थंडी कमी होणार आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये येत्या बुधवारपासून पावसासाठी पोषक वातावरण (Weather Update) तयार होणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

दक्षिणेकडील हिंदी महासागर आणि आग्नेय अरबी समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा (Weather Update) सक्रिय असून, तो वायव्येकडे सरकत आहे. या कमी दाब पट्ट्याचे तीव्र कमी दाब पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या तीव्र कमी दाब पट्ट्यामुळे राज्यातील मराठवाडा विभाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विशेषतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रातील 17 जिल्हे आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली अशा एकूण 22 जिल्ह्यांमध्ये हे ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. या काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कुठे थंडी तर कुठे पाऊस (Weather Update Today 1 January 2024)

राज्यात थंडी काहीशी कमी झाली असली तरी देशातील अनेक भागांमध्ये थंडी कायम आहे. राजस्थानातील सिकार येथे देशातील निच्चांकी 5.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान या उत्तर-पश्चिम भागातील राज्यांमधील अनेक ठिकाणी किमान तापमान 6 ते 9 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू आणि केरळमधील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यातील तापमानात काहीशी वाढ

उत्तरेकडील राज्यांमधून येणारे थंड वारे कमी झाल्याने राज्यातील थंडीमध्ये काहीशी घट झाली आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 14 अंशांहून अधिक असल्याचे पहायला मिळत आहे. मागील आठवड्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील 8.4 इतके निच्चांकी तापमान नोंदवले गेले होते. त्यात आता वाढ झाली असून, आज त्या ठिकाणी 11.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर उर्वरित राज्यांमधील अनेक भागांमध्ये तापमान 14 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आजपासून राज्यातील तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!