Weather Update: राज्यात अद्याप कडाक्याची थंडीची प्रतीक्षाच; कमाल तापमानात मात्र वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नोव्हेंबर महिना सुरु असला तरी म्हणावी तशी कडाक्याची थंडी (Weather Update) अद्यापही राज्यात अनुभवायला मिळत नाहीये. शिवाय दिवसाच्या कमाल तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. पहाटे गारठा आणि दिवसभर उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे.मागच्या २४ तासात रत्नागिरी येथे सर्वाधिक कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात अली आहे. तर किमान ११.६ अंशांची नोंद करण्यात आली आहे. तर आज कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

हवामान स्थिती

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागर आणि लगतच्या विषुववृत्तीय समुद्रात चक्राकार (Weather Update) वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारी (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. ११) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, शनिवारपर्यंत (ता. १२) तमिळनाडू आणि पद्दूचेरीच्या किनारपट्टीकडे येण्याचे संकेत आहेत.

कुठे किती तापमान ?(Weather Update)

बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२ (१५.८),
नगर ३२.४ (-)
जळगाव ३४ (१९.४)
धुळे ३३.५ (१२.२)
कोल्हापूर ३२.१ (१८.७)
महाबळेश्‍वर २६.७(१५.०)
नाशिक ३१.३ (१४.४)
निफाड ३२.२ (११.६)
सांगली ३१.९ (१७.२)
सातारा ३०.४(१५.८)
सोलापूर ३४.२ (१७.७)
सांताक्रूझ ३५ (२१.४)
डहाणू ३२.१ (१९.५)
रत्नागिरी ३५ (२१.४)
औरंगाबाद ३१.७ (१५.२)
नांदेड ३३.४ (१७)
उस्मानाबाद ३२.४ (१५)
परभणी ३२.१ (१५.९)
अकोला ३४.३ (१७.८)
अमरावती ३५.४ (१५.१)
बुलडाणा ३१.७ (१७.४)
ब्रह्मपुरी – (१७.३)
चंद्रपूर ३०.८ (१८.२)
गडचिरोली ३१ (१७)
गोंदिया ३२.४ (१५.५)
नागपूर ३२.६ (१५.९)
वर्धा ३१.५ (१६)
वाशीम ३४ (१६.२)
यवतमाळ ३३ (१५).

error: Content is protected !!