Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा; आज ‘या’ भागांना इशारा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या ढगाळ हवामानासह (Weather Update) ऊन सावल्यांचा खेळ सुरूच आहे. तर कुठे मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.9) राज्यात लातूर, हिंगोली, वर्धा, अमरावती आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये गारपिटीची नोंद झाली असून, या गारपीटीमध्ये एका 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशातच आता या आठवड्याच्या शेवटीपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.

खानदेशातही पावसाची हजेरी (Weather Update Today 10 April 2024)

मंगळवारी (ता.9) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खानदेशच्या पूर्व पट्ट्यात जळगाव जिल्ह्यातही पावसाची हजेरी (Weather Update) पाहायला मिळाली. दुपारच्या सुमारास चंद्रपूर, अमरावती, या भागांनाही पावसाचा तडाखा बसला. तर हिंगोली जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला आहे. या गारपिटीदरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यांना तडाखा

याशिवाय बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी (Weather Update) पाहायला मिळाली आहे. शेतात सध्या जास्तीची पिके नसली तरी काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, धारूर, परळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड शहरासह कंधार, लोहा, अर्धापूर यासह अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांना इशारा

दरम्यान, आज (ता. 10) विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याची शक्यता आहे. याशिवाय आज धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या कालावधीत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!