Weather Update Today : राज्यात मान्सूनची तीव्रता कमी झाल्याने कोकण वगळता राज्यातील उर्वरित भागात पुढील चार ते पाच दिवस हलक्या ते अति हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आज (दि १०) रोजी कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
राज्यात अनेक भागात पावसाची प्रतीक्षा
राज्यात गेल्या अनेक गेल्या काही दिवसात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात या पावसाचा मागमुसही नव्हता. अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत तसेच काही ठिकाणी पेरणी केलेली पिके पावसाअभावी जळून चालली आहेत.
विहिरींना तळ गाठला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. मराठवाड्यात नांदेड वगळता इतर जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये पावसाअभावी खरीप पिकांच्या पेरण्यांमध्ये घट झाली आहे.
हिमाचल प्रदेशात ढगफुटी
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात ढगफुटी झाली. त्यामुळे गिरी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे आसपासच्या भागात पुरस्थिती निर्माण झाली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.