Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान; वातावरणात मोठा बदल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा एक कमी दाब पट्टा (Weather Update) विस्तारला आहे. साधरणपणे समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर असलेला हा कमी दाब पट्टा पूर्व किनारपट्टीला दक्षिण ओडिसापर्यंत पसरला आहे. ज्यामुळे सध्या राज्यातील विदर्भ-मराठवाड्यातील भागांमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. या कमी दाब पट्ट्यामुळे राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भात बऱ्याच भागांमध्ये सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच या कमी दाब पट्ट्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान असणार आहे. असा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Update) वर्तवण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात उन्हाची काहिली (Weather Update Today 10 March 2024)

विशेष म्हणजे सध्या विदर्भ, मराठवाड्यातील या ढगाळ वातावरणामुळे (Weather Update) पावसाची शक्यता नाही. मात्र, सर्वच जिल्ह्यांमध्ये दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने मागील 24 तासांमध्ये अनेक भागांत 35 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. ज्यामुळे सध्या मार्च महिन्याच्या सुरवातीलाच विदर्भ मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या उन्हाच्या काहिलीचा अनुभव पाहायला मिळत आहे. तर या वाढत्या तापमानाचा उन्हाळी शेती पिकांना देखील मोठा फटका बसत आहे. आधीच पाण्याची कमतरता त्यात वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे, पिके ऊन धरत असल्याने लवकर लवकर पाणी द्यावे लागत आहे. याउलट राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या वरती सरकला आहे.

उद्यापासून ‘या’ भागांमध्ये पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील वातावरणात बदल पाहायला मिळतोय. प्रामुख्याने राजधानी दिल्ली आणि आसपासच्या सर्वच राज्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. पहिला पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. तर आणखी दोन दिवसांत दुसऱ्या चक्रीय वाऱ्यांचा झोत उत्तर-पश्चिम भारतीय राज्यांमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे सोमवारपासून पुढील चार दिवस जम्मू आणि काश्मीर, गिलगिट बलुचिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबाद या भागांमध्ये पाऊस बरसणार आहे. तर काही भागांमध्ये बर्फवृष्टी होणार आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेशच्या पश्चिम भागात देखील पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!