Weather Update : मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान; आजही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान (Weather Update) खात्याने वर्तवलेल्या आनंदाजानुसार आज राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून राज्यात हलक्या ते माध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय राज्यातील तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हवामान स्थिती

राजस्थान आणि परिसरावर (Weather Update) चक्राकार वाऱ्यांची स्थिती हरियाणा आणि परिसराकडे सरकली आहे. उत्तर गुजरात पासून ईशान्य दक्षिण हरियाणा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. तामिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून रायलसीमा, तेलंगणा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश ते ईशान्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा सोमवारी (ता. १०) कायम होती. माघारीस पोषक वातावरण (Weather Update) होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून काढता पाय घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

error: Content is protected !!