हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरणासह (Weather Update) पाऊस पाहायला मिळत होता. मात्र आता पावसाचे प्रमाण कमी होऊन थंडीच्या कडाक्यामध्ये वाढ होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान शास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असून, थंडीमध्ये काहीशी वाढ (Weather Update) झालेली पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये असलेले राज्यातील ढगाळ हवामान (Weather Update) आजपासून कमी होणार असून, राज्यात सर्वदूर कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. परिणामी राज्यातील तापमानात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जवळपास चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढू शकतो. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीच्या आसपासच्या दिवसांमध्ये राज्यात चांगलाच थंडीचा कडाका पडणार असल्याचे संकेत मिळत आहे.
वायव्येकडील वाऱ्यांमुळे थंडी वाढणार (Weather Update Today 11 Jan 2024)
दक्षिण अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे, तसेच आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वारे, पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र या चक्रीय वाऱ्यांची गती कमी होऊन, एक पश्चिमी थंडीच्या लाटेची साखळी उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. 12 जानेवारीला ही लाट देशाच्या वायव्य भागाकडून प्रवेश करून शकते. ज्याचा परिणाम म्हणून राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुन्हा थंडी वाढणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
राज्यातील काही भागांचे तापमान
मागील 24 तासांमधील राज्यातील काही भागांमधील कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 24.8 (16.4), धुळे 31.5 (13.5), जळगाव 30.7 (16.2), कोल्हापूर 26 (19.5), महाबळेश्वर 18.9 (14.2), नाशिक 29.3 (17.2), निफाड 29.3 (17.2), सांगली 25.8 (19.9), सातारा 25.7, सोलापूर 28.7 (19.9), सांताक्रूझ 31.9 (22), डहाणू 27.2 (21.6), रत्नागिरी 29.5 (24.2), छत्रपती संभाजीनगर 24.8 (15.9), नांदेड 29.8 (19), परभणी 24.6 (18.2), अकोला 29.1 (18), अमरावती 28.8 (18.3), बुलडाणा 27.5 (16.8), ब्रह्मपुरी 33.3 (18.1), चंद्रपूर 30.2 (15.8), गडचिरोली 29.4 (16.6), गोंदिया 30.3 (18.2), नागपूर 28.6 (20), वर्धा 27.8 (19.8), वाशीम 25.6 (16.2), यवतमाळ 31.5 (16.7).