Weather Update : राज्यात 3 दिवस पावसाची शक्यता कायम; पूर्व भागात सर्वदूर हजेरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या विदर्भ-मराठवाडा भागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये (Weather Update) मागील तीन ते चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळाली आहे. त्यातच राज्यभरात तीव्र उष्णतेसह (Heat Wave) उकाडा कायम असला तरी या पावसामुळे हवेत काहीसा थंडावा निर्माण होऊन, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशातच आता आणखी 15 एप्रिलपर्यंत अर्थात तीन दिवस राज्यावरील अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट कायम राहणार असल्याचे (Weather Update) भारतीय हवामानशास्र विभागाने (IMD) म्हटले आहे.

आज ‘या’ भागांमध्ये बरसणार (Weather Update Today 12 April 2024)

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस (Weather Update) होण्याचा अंदाज आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर लातूर, बीड, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर या सह अन्य काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

का पडतोय एप्रिलमध्ये पाऊस?

महाराष्ट्राच्या परिसरावर समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे. हे वारे प्रामुख्याने बंगालच्या उपसागराहून (Bay of Bengal) येत असून, त्याच वेळी पश्चिमेकडील अरबी समुद्रात देखील चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे. ज्यामुळे राज्यात सध्या दोन्ही बाजूने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कमी दाब क्षेत्र (Low Pressure Area) तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे मागील तीन दिवसांमध्ये विदर्भ-मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. तर काही भागांमध्ये वादळी पावसासह गारपिटीची (Hailstorm) देखील नोंद झाली आहे.

‘या’ राज्यांमध्ये पावसाची स्थिती

दरम्यान, महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेश, छत्तीसगडसह सध्या देशातील काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्येही हलका स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज या या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम असून, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!