Weather Update Today : महाराष्ट्रातील गायब झालेला पाऊस कधी परतणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update Today : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाने उघडीप दिलेली कायम आहे. हवामान विभागाने ऑगस्टमध्ये पाऊस तुरळ ठिकाणी पडेल असा अंदाज वर्तविला होता आणि तो अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी अद्याप पाऊस चांगलीच उघडीप दिलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील गायब झालेला पाऊस कधी परतणार याबाबत हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

राज्यात ढगाळ वातावरण

उर्वरित राज्यामध्ये आकाश ढगाळ असून ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग पडत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अद्यापही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही अशा ठिकाणची पिके सुकू लागली आहेत त्यामुळे शेतकरी देखील मोठ्या चिंतेत आहेत

अजून १० दिवस पाऊसाची शक्यता कमी

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पाऊस झाला. अनेकांच्या पेरण्या यामुळे लांबल्या. मात्र आता पुन्हा आगस्ट महिन्यातही पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने मान्सूनबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे. अजून १० दिवस पाऊसाची शक्यता कमीच राहील असे सांगण्यात आले आहे. म्हणजे साधारण २० ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस कमी प्रमाणात राहणार असल्याचे IMD कडून सांगण्यात आले आहे.

आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्‍यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित भाग राज्यात पावसाची उघडीप असणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांवर रोग पडण्याचे देखील मोठे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची काळजी घ्यावी अशी आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे

तुमच्या गावात पाऊस कधी पडणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या गावांमध्ये पाऊस कधी पडणार याबाबत अचूक माहिती पाहिजे असेल तर लगेचच प्ले स्टोअरला जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी हवामान अंदाज या ऑप्शनवर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही राज्यातील हवामान अंदाज पाहू शकता त्याचबरोबर तुमच्या गावांमध्ये कधी पाऊस पडणार याबाबत देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. ही सर्व माहिती तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा

जाणून घ्या कृषी सल्ला –

सततचे ढगाळ हवामान, उच्च आर्द्रता यामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. संबंधित किडींच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करताना वाऱ्याचा वेग व दिशा, पाऊसमान आणि स्थानिक हवामान या बाबी लक्षात घ्याव्यात. कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद,मुग व मका या पिकातील आंतरमशागतीची कामे स्थानिक हवामान परिस्थिती पाहून करावी. आंतरमशागतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर झिरपण्यास मदत होते. पावसामुळे जनावरांचा चारा खराब होणार नाही व त्याला बुरशी लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पावसाळ्यात जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.

जिल्हा कृषी हवामान केंद्र,
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.
डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला.

error: Content is protected !!