Weather Update : राज्यात तापमान चाळीशी पार; उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाची ताप (Weather Update) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. आज (ता.१२) राज्यातील प्रामुख्याने नागपूर या ठिकाणी उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय जळगाव ४०.८ अंश, सोलापूर ४०.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर अकोला, धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये देखील कमाल तापमान चाळीशी पार पोहचले आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे सध्या राज्यात अनेक भागांमध्ये दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उकाडा (Weather Update) पाहायला मिळत आहे.

तापमानात आणखी वाढ होणार (Weather Update Today 12 March 2024)

दरम्यान, राज्यातील कमाल तापमानात (Weather Update) मोठी वाढ झालेली असतानाच, किमान तापमानाने देखील उसळी घेतली आहे. ज्यामुळे राज्यातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली आहे. मुख्यतः मागील २४ तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये १३ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान नोंदवले गेले आहे. याउलट राज्यातील काही निवडक जिल्हे वगळता कमाल तापमान सर्वच भागांमध्ये पस्तिशी पार पोहचले आहे. त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये उन्हाची ताप वाढली असून, आगामी आठवडाभरात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्तरेकडे पावसाचे वातावरण कायम

याउलट उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण (Weather Update) कायम असून, दोन दिवसांपूर्वी एक पश्चिमी चक्रवाताने वायव्येकडील भागात प्रवेश केला आहे, अशातच आता पुन्हा दुसरा पश्चिमी चक्रवात देशाच्या वायव्येकडील भागातून उत्तर भारतीय राज्यांमध्ये दाखल झाला आहे. ज्यामुळे सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम असून, उत्तर भारतीय प्रदेशातील सर्वच राज्यांमध्ये आजही अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून कायम ठेवण्यात आला आहे. प्रामुख्याने पुढील दोन दिवस या पश्चिमी चक्रवाताचा परिणाम या राज्यांमध्ये पाहायला मिळणार असून, त्यानंतर मात्र, सामान्य हवामान पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

error: Content is protected !!