Weather Update : अलर्ट ! पुढच्या 3-4 तासात पुणे, मुंबई, नाशिक भागात तीव्र सरींसह पाऊस; ‘या’ भागात अतिमुसळधार …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यामध्ये मान्सून (Weather Update) चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय. दरम्यान पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात अधून मधून तीव्र सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. आज सकाळी साडेसात वाजता रडार वरून नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणावरून हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

हवामान स्थिती

भारतीय हवामान खात्याने गुजरात महाराष्ट्र पश्चिम बंगाल ओडीसा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यामध्ये येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा (Weather Update) इशारा दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिसामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यासह इतर राज्यातही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

या भागाला अलर्ट

हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा (Weather Update) अंदाज ही वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळ मध्ये जोरदार पावसाची शक्‍यता तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी देखील आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

error: Content is protected !!