Weather Update : राज्यात थंडीत आणखी वाढ होणार; किमान तापमानात घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण (Weather Update) पूर्णतः निवळले असून, हळहळू थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीचा भाग सोडता उर्वरित राज्यातील सर्व भागांमध्ये किमान तापमान हे सध्या 18 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यातच 19 जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट जाणण्यास सुरुवात होईल. 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत राज्यातील किमान तापमानात मोठी घट (Weather Update) दिसून येईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तरेकडे थंडीची लाट (Weather Update Today 14 Jan 2024)

मागील आठवड्यातील पावसाच्या वातावरणानंतर (Weather Update) उत्तरेकडील दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहारमध्ये प्रचंड थंडी पाहायला मिळत आहे. पुढील चार ते पाच दिवसांत या भागांमध्ये थंडीसह धुके वाढण्याची शक्यता असून, थंडीची तीव्र लाट पाहायला मिळू शकते. त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार असून, राज्यातही किमान तापमानात मोठी घट होऊन थंडी वाढण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. देशाच्या वायव्य भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या झोतांमुळे थंडीत ही वाढ होणार आहे.

‘या’ भागात पावसाची शक्यता

दरम्यान राज्यात पावसाचे वातावरण निवळले असले तरी, दक्षिण तामिळनाडूमध्ये आजही मुसळधार पावसाची कायम असून, आज केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहणार आहे. तर उद्यापासून दक्षिणेकडील तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात या भागांमध्ये पाऊस उघडीप घेणार आहे. पुढील दोन दिवस उत्तर भारतात जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

मागील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे 32.5 (14.4), धुळे 32.0 (14.0), जळगाव – (16.8), कोल्हापूर – 31.5 (18.2), महाबळेश्वर – 26.8 (16.6), नाशिक 30 .4 (15.7), निफाड 29.0 (13.4), सांगली 32.0 (16.9), सातारा 32.2 (15.5), सोलापूर 34.5 (20.9), सांताक्रूझ 35 .7 (22.0), डहाणू 29.5 (20.4), रत्नागिरी 35.4 (20.2), छत्रपती संभाजीनगर 29.6 (15.6), नांदेड – (18.2), परभणी 31. 3 (17.3), अकोला 32.3 (18.4), अमरावती 30.2 (17.1), बुलढाणा 30.8 (17.0), ब्रह्मपुरी 33.0 (17.4), चंद्रपूर 30. 6 (17.0), गडचिरोली 30.0 (16.6), गोंदिया 28.8 (15.0), नागपूर 30.1 (16.6), वर्धा 30.1 (16.6), वाशीम 30. 8 (15.4), यवतमाळ 31.7 (15.5).

error: Content is protected !!