Weather Update : ढगाळ वातावरणासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता – आयएमडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पावसाचे वातावरण सध्या काही प्रमाणात (Weather Update) निवळले आहे. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण कायम असणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) (आयएमडी) व्यक्त केला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान (Weather Update Today 15 Feb 2024)

देशातील हवामानासह राज्यात सध्या वातावरणात कमालीचे बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. कुठे थंडी, कुठे पाऊस तर कुठे उन्हाच्या झळा अशी स्थिती देशातील अनेक भागांमध्ये आढळून येत आहे. १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्यात झालेल्या गारपिटीनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र, आज आणि उद्या विदर्भात पावसाची शक्यता कायम असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने कोरडे हवामान राहणार आहे. तसेच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात देखील फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कमाल, किमान तापमान स्थिर

गेल्या चार ते पाच दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे ८.६ अंश सेल्सिअस निच्चांकी तापमान कायम आहे. तर तिकडे सोलापुरातही ३५ अंशांचा वर असलेला किमान तापमानाचा पारा कायम आहे. सोलापुरात मागील २४ तासांमध्ये ३६.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यातील गोंदिया (२९.६ अंश सेल्सिअस) वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान असलेले पाहायला मिळत आहे. विशेषतः पश्चिम व मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळा जाणवत आहेत.

उत्तर-पूर्व भागातही पाऊस

याउलट उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडी वाढलेली पाहायला मिळत आहे. यात प्रामुख्याने मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, नवी दिल्ली, उत्तराखंड या भागांत किमान तापमानात घट झाली आहे. तर विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये देखील पुढील दोन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर-पूर्व भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने हा पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!