Weather Update : राज्यात थंडीचा जोर कायम; निफाडचा पारा 7.4 अंशावर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्यात प्रवेश (Weather Update) केला असून, राज्यात अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गारठा वाढला आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चांकी 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यातच आता राज्यात थंडीमध्ये झालेली ही वाढ (Weather Update) कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

धुळ्यातही पारा घसरला (Weather Update Today 17 Jan 2024)

उत्तर महाराष्ट्रातील निफाड पाठोपाठ धुळे येथील कृषी महाविद्यालयात 8 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सध्या अनेक भागांमध्ये किमान तापमान हे 7.4 ते 16 अंशांच्या दरम्यान असल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून पाहायला मिळत आहे. राज्यात किमान तापमानातील घट कायम राहून, थंडीत आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तरेकडे किमान तापमानात मोठी घट

याशिवाय उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडीने चांगलाच जोर धरला असून, मागील 24 तासांमध्ये हरियाणा राज्यातील हिस्सार येथे निच्चांकी 1.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली असून, पूर्व किनारपट्टीवरील ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

राज्यातील काही भागांतील तापमान

मागील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान अंश सेल्सियसमध्ये : पुणे 32.1 (10.8), अहमदनगर 28.8 (9.6), धुळे 28.5 (8), जळगाव 30.4 (9.4), कोल्हापूर 31.7 (16.9), महाबळेश्‍वर 26.8 (14.7),नाशिक 29.3 (9.8), निफाड 28.8 (7.4), सांगली 32.1 (15.8), सातारा 31.3 (12.4), सोलापूर 33.7 (14.5), सांताक्रूझ 31.3 (16.2), डहाणू 28.3 (15.5), रत्नागिरी 32.6 (16.3), छत्रपती संभाजीनगर 29.2 (9.2), नांदेड 30.2 (14), परभणी 30.6 (13.5), अकोला 30.6 (12.3), अमरावती 29.4 (13.5), बुलडाणा 28.5 (12.6), ब्रह्मपुरी 32.6 (15.8), चंद्रपूर 30.6 (14.4), गडचिरोली 31.4 (14.2), गोंदिया 29.8 (12.4), नागपूर 30 (14.2), वर्धा 31 (14), वाशीम 32.4 (14.0), यवतमाळ 32 (11.5).

error: Content is protected !!