Weather Update : राज्यात पावसाचा दणका कायम ! आजही ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसाने (Weather Update) राज्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. संध्याकाळनंतर पुणे, कोल्हापूर साताऱ्यासह अनेक भागात मेघगर्जना आणि विजांच्या कड्कडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सखल भागाला यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते तर रस्त्यांवर आणि शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. दरम्यान आज देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात राज्यात विजांच्या कडकडाटास पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

हवामान स्थिती

मध्य अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तर अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. केरळच्या ( Weather Update) किनाऱ्यालगत असलेल्या प्रणाली पासून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. गुरूवारपर्यंत (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

या भागाला आज यलो अलर्ट

दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागात विजांसह पाऊस ( Weather Update) होणार असून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

error: Content is protected !!