Weather Update Today : आजपासून (दि. १८) विदर्भ, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, येत्या काही तासांत तो तीव्र होण्याची तयारी सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून उघडीप घेतल्यानंतर विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. आजपासून दि. १८ ऑगस्ट ते दि. २० ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तुमच्या गावात पाऊस पडणार का हे मोबाईलवरून करा चेक
शेतकरी मित्रांनो आता तुमच्या गावात पाऊस पडणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. या अँपवर आपल्याला स्वतःच्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाजासोबत रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे आदी सेवा इथे मोफत दिल्या जातात. १ लक्षणहून अधिक शेतकरी सध्या हॅलो कृषी अँपचा वापर करत आहेत. तुम्हीही आजच हॅलो कृषी डाउनलोड करून घ्या.
आज विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला असून दि. २० ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून नागपुरात पाऊस सुरू झाला आहे. यात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये चांगला पाऊस होईल तर दि. १९ ऑगस्टला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच दि. २० ऑगस्टला पश्चिम विदर्भात जिल्ह्यात पाऊस होणार आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मागील पंधरा दिवसापासून पावसाने पुन्हा दांडी मारल्याने ऑगस्टमध्ये सरासरी पावसात १२ टक्क्यांची तूट झाली आहे. त्यामुळे या तीन दिवसात चांगला पाऊस होऊन ही तूट भरून निघावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.