Weather Update : राज्यात पावसाची स्थिती कायम तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाचा तडाखा अद्यापही सुरूच आहे. राज्यातील बऱ्याच भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस (Weather Update) झाला आहे. दरम्यान हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. आज (१९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या सरींची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची (Weather Update) निर्मिती झाली आहे. उद्यापर्यंत (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवार पर्यंत (ता. २२) आणखी तीव्र होणार असून, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

हवामान स्थिती

पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. मंगळवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोकण, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update)आज औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

 

error: Content is protected !!