Weather Update: राज्यात गारठा वाढला; निफाड येथे हंगामातील निचांकी 8.5 अंश तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कालपासून खऱ्या अर्थाने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे (Weather Update) असे म्हणायला हरकत नाही. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात किमान तापमान घटले आहे. मागच्या २४ तासात निफाड येथे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर देशात २४ तासांमध्ये राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज दिनांक १९ रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

हवामान स्थिती ?

अंदमान समुद्रातील कमी दाब क्षेत्र आग्नेय बंगालच्या उपसागरात आहे. त्याला लागूनच (Weather Update) समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली रविवारपर्यंत (ता. २०) आणखी तीव्र होऊन, तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात विषूववृत्ताजवळ समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

कुठे किती तापमान ?(Weather Update)

गुरूवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.५ (११.२), नगर ३०.६ (११.४), जळगाव ३१.८ (१०.३), धुळे ३०.० (९.०), कोल्हापूर ३१.१ (१७.०), महाबळेश्वर २५.७(१२.०), नाशिक २९.६ (११.२), निफाड २९.२ (८.५), सांगली ३१.३(१५.५), सातारा २९.५(१५.२), सोलापूर ३३.६ (१६.४), सांताक्रूझ ३४.२(२२.२), डहाणू ३१.६ (१८.९), रत्नागिरी ३५.२ (२०.१), औरंगाबाद ३०.२ (११.४), नांदेड ३१.४ (१६.०), परभणी ३२.२ (१४.६), अकोला ३२.६ (१४.८), अमरावती ३२.६ (१३.८), बुलढाणा २९.४ (१४.२), ब्रह्मपूरी ३१.६ (१६.२), चंद्रपूर २९.४ (१६.४), गडचिरोली ३०.२(१३.९), गोंदिया ३०.२(१४.४), नागपूर ३१.५ (१४.१), वर्धा ३२.० (१६.०), वाशीम ३१.८ (१४.८), यवतमाळ ३२.० (१३.०).

error: Content is protected !!