Weather Update : 3 ते 4 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा.. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने (Weather Update) पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर सध्या राज्यभर उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतोय. अशातच आता देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये काढणीला आलेल्या गहू, हरभरा या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

आर्द्रतायुक्त चक्रीय वाऱ्यांचा झोत (Weather Update Today 19 February 2024)

देशाच्या वायव्य भागातून आर्द्रतायुक्त चक्रीय वाऱ्यांचे झोत भारतात टप्प्याटप्प्याने प्रवेश करत आहेत. ज्यामुळे मागील पंधरवड्यात अगोदर उत्तर भारतीय राज्यांमध्ये गारपिटीसह पाऊस (Weather Update) झाला. त्यानंतर याच झोतामुळे पूर्व भारतीय राज्यांमध्ये पाऊस झाला. आणि शेवटी बंगालच्या उपसागराहून वळते होऊन हेच वारे मागील आठवड्यात महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्यापर्यंत पोहचले होते. ज्यामुळे मागील आठवड्याभर विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये भाग बदलत गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. मात्र, आता पुन्हा एकदा वायव्य भारतात आणखी एका आर्द्रतायुक्त चक्रीय वाऱ्यांच्या झोताने प्रवेश केला आहे. ज्यामुळे पुढील तीन ते चार दिवस देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कोणत्या राज्यांना इशारा?

  • 22 फेब्रुवारीपर्यंत – जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश, मुझफ्फराबाद, उत्तराखंडमध्ये गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता.
  • 19 ते 20 फेब्रुवारी – हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शकते.
  • 21 ते 24 फेब्रुवारी – सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये हलका ते मध्यम पाऊस व हिमवर्षाव होऊ शकतो.
  • 19 ते 21 फेब्रुवारी – उत्तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
  • 19 ते 22 फेब्रुवारी – पूर्व उत्तरप्रदेश आणि उत्तर मध्यप्रदेशात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता.

तापमानात चढ-उतार कायम

दरम्यान, राज्यात सध्याच्या घडीला किमान आणि कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच आहे. मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी राज्यातील 13.8 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर याउलट दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मात्र उन्हाची ताप वाढलेली पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये सोलापूर या ठिकाणी उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे रब्बी पिकांना लवकर लवकर पाणी देण्याची गरज पडत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!