Weather Update : 13 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार; उकाड्यात प्रचंड वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून दिवसाचे कमाल तापमान (Weather Update) हे ४० अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. अशातच आणखी दोन महिने उष्णतेच्या प्रचंड लाटा पाहायला मिळणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे. परिणामी, पुढील दोन महिने नागरिकांना प्रचंड उकाड्याला (Weather Update) सामोरे जावे लागणार आहे.

चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय (Weather Update Today 2 April 2024)

सध्याच्या घडीला कर्नाटक, मध्यप्रदेश, विदर्भ, दक्षिण तामिळनाडूपर्यंतच्या भागावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती (Weather Update) सक्रिय आहे. परिणामी, राज्यात दिवसा उन्हाचा तडाखा असह्य होत आहे. तर रात्री प्रचंड उकाडा जाणवत आहेत. प्रामुख्याने राज्यातील सर्वच भागांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या उकाड्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. या उन्हाच्या तीव्रतेचा उन्हाळी पिकांना देखील मोठा फटका बसत आहे. पिकांना अधिक पाण्याची गरज पडत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध पाण्यानुसार लागवड केलेल्या उन्हाळी पिकांना पाण्याचा ताण पडत आहे. ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशी पार

राज्यात मागील २४ तासांमध्ये अकोला या ठिकाणी सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस तापमान (Weather Update) नोंदवले गेले आहे. तर आज नागपुरात उच्चांकी तापमान नोंदवले जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या राज्यात अहमदनगर ४०.१, अकोला- ४३.८, छत्रपती संभाजीनगर- ४१.६, बुलढाणा- ४१.२, धुळे- ४२.७, जळगाव-४३.७, लातूर – ४०.६, नागपूर- ४३.२, नाशिक- ४१.१, धाराशिव- ४२, पुणे- ४०.८, रायगड-४१.३, सोलापूर-४२.६ आणि वर्धा- ४२.२ या १३ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात कोरडे हवामान

दरम्यान, सध्याच्या घडीला चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय असली तरी उष्णतेत आणखी वाढ होणार असून, राज्यातील सर्वच भागांमध्ये कोरडे हवामान कायम राहणार आहे. राज्यात सध्या कोणत्याही भागात पावसाची परिस्थिती नाही. मात्र, आठवड्याच्या शेवटी वातावरणात बदल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

error: Content is protected !!