Weather Update : राज्यातील 14 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ भागाला गारपिटीचा तडाखा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस (Weather Update) महाराष्ट्राची पाठ सोडता सोडत नाहीये. अशातच आणखी 23 एप्रिलपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (ता.20) राज्यात पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय आजही राज्यातील बहुतांश सर्वच भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम (Weather Update) राहणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update Today 20 April 2024)

राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढला आहे. तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या तडाखा (Weather Update) सुरूच आहे. आज (ता.20) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात नमूद केले आहे.

राज्यात उकाडा कायम

अवकाळी पावसासोबतच राज्यात उकाडा कायम (Weather Update) आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील अकोला या ठिकाणी उच्चांकी 44 अंश सेल्सिअस इतके तापमान इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. तर चंद्रपूर 43.8, वाशीम 43.6, मालेगाव 43.8, जळगाव 43.2, धुळे 43.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. याशिवाय परभणी 42.5, संभाजीनगर 42.2, ब्रह्मपुरी 42.2, सोलापूर 42, अमरावती 42, यवतमाळ 42 या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 42 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

हरियाणात गारपिटीचा तडाखा

दरम्यान, हवामान विभागाचा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून, देशाच्या वायव्येकडील भागात पश्चिमी चक्रवाताने प्रवेश केला आहे. ज्यामुळे शुक्रवारी (ता.20) हरियाणा राज्यात गारपीट झाली आहे. ज्यामुळे हमीभावाने गहू खरेदी सुरु असलेल्या बाजार समित्यांमध्ये गारांचा खच साचल्याचे सांगितले जात आहे. तर हरियाणासह आसपासच्या राज्यांमध्येही शुक्रवारी पावसाची नोंद झाली आहे. आणखी दोन दिवस जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजधानी दिल्लीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

error: Content is protected !!