Weather Update : 2 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील वातावरणात कमालीचा बदल (Weather Update) दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी, मध्य व दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका पडत आहे. तर याउलट देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये काही भागात पावसाचे वातावरण कायम आहे. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाख आणि उत्तरेकडील आसपासच्या इतर राज्यांमध्ये आजही पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. देशाच्या वायव्य भागातून येणाऱ्या आर्द्रतायुक्त चक्रीय वाऱ्यांच्या झोतामुळे या भागात पावसाची शक्यता (Weather Update ) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तापमानात चढ-उतार कायम (Weather Update Today 21 February 2024)

राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहे. किमान तापमानात पुन्हा एकदा मोठी घट (Weather Update) दिसून आली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी 14 अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे किमान तापमान मागील 24 तासांमध्ये 9.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. तर राज्यातील कमाल तापमानातही जवळपास 1 अंश सेल्सिअसने घट होऊन, ते सोलापूर या ठिकाणी 36.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.

अनेक जिल्ह्यात पस्तिशी पार

सध्यस्थितीत राज्यातील अनेक भागामध्ये किमान तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान तर कमाल तापमानाचा पारा 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर पुणे, धुळे, मालेगाव (नाशिक), सांगली, नांदेड, परभणी, अकोला, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले गेले आहे.

हिवाळ्यात पावसाळी दिवस अधिक

यावर्षी देशासह राज्यातील अनेक भागात हिवाळा कमी आणि पावसाळी दिवसच अधिक पाहायला मिळाले. साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटी आठवडाभर पावसाचे वातावरण होते. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याचा पहिला संपूर्ण आठवडा राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाच्या वातावरणातच गेला. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात 10 ते 17 तारखेदरम्यान मागील आठवड्यात राज्यातील पूर्व भागात भाग बदलत गारपीट आणि पाऊस झाला. ज्यामुळे यावर्षीच्या हिवाळी हंगामात पावसाच्या वातावरणामुळे दरवर्षीच्या तुलनेत अधिक थंडी जाणवली नसल्याचे अनुभवायला मिळाले.

error: Content is protected !!