Weather Update : कुठे पाऊस, कुठे बर्फवृष्टी तर कुठे थंडी; वाचा, महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण (Weather Update) तयार झाले असून, उद्यापासुन (ता.25) अनेक भागांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. अशातच पुढील दोन दिवस हिमालयीन पट्ट्यातील राज्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.” असे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे. तसेच पुढील 24 तासांत झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीममधील काही भागातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होऊ शकते. सिक्कीममध्येही काही भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता (Weather Update) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस (Weather Update Today 24 Feb 2024)

देशाच्या वायव्य-पश्चिम भागातून येणाऱ्या चक्रीय वाऱ्यांमुळे हवामानात सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत असून, यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच आता महाराष्ट्रात उद्या (ता.25) दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सोमवारी (ता.26) या तीनही जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता आहे. त्यानंतर 27 तारखेला विदर्भ-मराठवाड्याचा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पाऊस पाहायाला मिळू शकतो. असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कमाल, किमान तापमानात घट

राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे किमान तापमान पुन्हा 8.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. जे शुक्रवारी 13.8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले होते. ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवत आहे. याशिवाय आज धुळे येथेही किमान तापमान 1 अंश सेल्सिअसने घसरून 11.6 अंशांपर्यंत खाली आले आहे. तसेच मागील 24 तासांमध्ये राज्यात कमाल तापमानातही मोठी घट झाली असून, सोलापूर (35.8), वाशीम (35.6) हे दोन जिल्हे वगळता राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या कमाल तापमान 35 अंशांहून खाली घसरले आहे.

error: Content is protected !!