हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाहीये. संपूर्ण एप्रिल महिनाभर राज्यात भाग बदलत पाऊस (Weather Update) पाहायला मिळाला. या अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. अशातच आता पुन्हा एकदा पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. याशिवाय पुढील 4 ते 5 दिवसात राज्यासह मध्य भारतात कमाल तापमानात 3 ते 4 अंशाने वाढ (Weather Update) होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update Today 25 April 2024 Maharashtra)
25 एप्रिल 2024 – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली – यलो अलर्ट. (Weather Update)
26 एप्रिल 2024 – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली – यलो अलर्ट.
27 एप्रिल 2024 – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली – यलो अलर्ट.
कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता
दरम्यान, राज्यात प्रामुख्याने कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता (Weather Update) असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील 24 तासात उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. तर मागील 24 तासांमध्ये राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी राज्यातील उच्चांकी 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय धुळे 41, जळगाव 40.8 आणि चंद्रपूर 40.8 येथे 40 अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले आहे. ज्यामुळे सध्या कमाल तापमान काहीसे घटले आहे. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यातही पावसाची शक्यता
याउलट देशातील काही राज्यांमध्ये कडक उन्हाळा तर उत्तर भारतातील काही भागात पावसामुळे वातावरणात थंडावा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.