Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता; उकाडा कायम राहणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या महिनाभरापासून भाग बदलत झालेल्या वादळी पावसाने (Weather Update) सध्या राज्यात उघडीप घेतली आहे. सध्याच्या घडीला राज्यात सर्वत्र कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्यामध्ये पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 3 आणि 4 मे रोजी काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर 4 आणि 5 मे रोजी विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

अकोला येथे उच्चांकी तापमान (Weather Update Today 3 April 2024)

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (Weather Update) कायम आहे. असे असतानाच राज्यात आकाश निरभ्र असल्याने, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. मागील २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

तसेच अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका कायम असल्याने चंद्रपूर, सोलापूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वर्धा येथे 42 अंश, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार आहे. आज (ता.3) कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तसेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

थंड हवेचा झंझावात सक्रिय

याउलट उत्तर भारतात किमान तापमान 10 ते 14 अंशांवर आहे. त्यामुळे तिकडून थंड वारे वाहत आहेत. पश्चिम विक्षोप म्हणजे उत्तरेकडून येणारा थंड हवेचा झंझावात सक्रिय असून, हा थंड हवेचा प्रवाह अरबी समुद्रावरून वाटचाल करीत पश्चिम घाटावरून मध्य महाराष्ट्राकडे येत आहे. हे वारे आपल्यासोबत अरबी समुद्रातील बाष्प वाहून आणत आहेत. ज्यामुळे या वाऱ्यांमुळे दुपारी उकाडा जाणवेल, असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

error: Content is protected !!