Weather Update : आज ‘या’ भागात पावसाची शक्यता; वाचा.. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील वातावरणात सध्या कमालीचे बदल पाहायला (Weather Update) मिळत आहे. कधी पाऊस, कधी उष्णतेची लाट, तर कधी पुन्हा पावसाचे वातावरण अशी काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याउलट देशातील वायव्य भागात आजही पावसाची शक्यता कायम असून, हिमाचल प्रदेशसह देशाच्या संपूर्ण वायव्य भागात पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.

तीन दिवस उकाडा जाणवणार (Weather Update Today 3 April 2024)

महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, आज राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा (Weather Update) जाणवणार आहे. प्रामुख्याने गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दिवसाचे तापमान 38 ते 44 अंशांपर्यंत कायम आहे. अशातच आणखी तीन दिवस राज्यात उकाडा कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र, राज्यात वातावरणात पुन्हा बदल होऊन, पावसाला पोषक असे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भाग बदलत, हा पाऊस होऊ शकतो.

शनिवारपासून पावसाला पोषक वातावरण

साधारणपणे 6 तारखेपासून राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. 7 व 8 एप्रिल रोजी राज्यातील विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तर 11 एप्रिल रोजी कोकण वगळता राज्यातील सर्व भागांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. तर या कालावधीत राज्यातील कमाल तापमानात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उष्णतेच्या लाटेचा कालावधी वाढणार

राज्यात पावसाची शक्यता असतानाच पुढील दोन महिने कमाल तापमान चढेच राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीने नुकताच पुढील दोन महिन्यांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यात म्हटले आहे की, देशाच्या बऱ्याच भागात सध्या उष्णतेच्या लाटेचे दिवस 4 ते 8 दिवस असे आढळून येत आहे. मात्र, आगामी दोन महिन्यांमध्ये उष्णतेचा लाटेचा हाच प्रभाव 10 ते 20 दिवस इतका राहण्याची शक्यता अधिक असणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!