Weather Update Today : आज महाराष्ट्रात या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट जारी, पहा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update Today : राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. आज (दि. ३) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उजनी धरण भरण्यासाठी ५३ टीएमसी पाण्याची गरज

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. १ ऑगस्टला उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ६४.११ टीएमसी झाल्याने उजनी धरण उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. १ ऑगस्ट रोजी उजनी धरणातील जलसाठा प्लसमध्ये आला आहे. १८ जुलै ते १ ऑगस्ट या चौदा दिवसांत उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १८.५२ टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून उजनी जलाशयात ११०८० क्युसेकने पाणी येत आहे.

error: Content is protected !!