Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली; पुढील 48 तासांत ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 48 तासांत हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांतही काहीसे ढगाळ वातावरण वातावरण पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने (Weather Update) म्हटले आहे.

दक्षिणकडे अरबी समुद्रात एक सौम्य कमी दाब पट्टा (Weather Update) निर्माण झाला असून, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या कमी दाब पट्ट्यामुळे पूर्व आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढणार असून, परिणामी पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील तापमानात वाढ (Weather Update Today 3 Jan 2024)

देशभरातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत असून, राज्यात थंडीची लाट सध्या काहीशी कमी झाली आहे. मंगळवारी (ता. 2) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर उर्वरित राज्यात किमान तापमान 14 ते 20 अंशांच्या दरम्यान असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र असे असले तरी राजस्थान व उत्तर-पश्चिमेकडील काही राज्यांमध्ये थंडी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानातील सिकर येथे मंगळवारी (ता. 2) देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी 4.5 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली आहे.

काही भागांमधील तापमान

राज्यातील काही भागांमधील गेल्या 24 तासांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 31.5 (13.6), धुळे 31.5 (12.5), जळगाव 30.4 (15.2), कोल्हापूर 29.9 (17.8), महाबळेश्‍वर 27.5 (15), नाशिक 30.4 (14.5), निफाड 29 (12.8), सांगली 29..8 (16.8), सातारा 30.7 (14.1), सोलापूर 32 (17), सांताक्रूझ 31.9 (11.8), डहाणू 29.9 (19.7), रत्नागिरी 31.5 (23), छत्रपती संभाजीनगर 29.2 (14.9), नांदेड – (16.8), परभणी 29.9 (16.1), अकोला 30.9 (16.4), अमरावती 29.6 (15.3), बुलडाणा 29.4 (16.7), ब्रह्मपुरी 32.2 (14.3), चंद्रपूर 28.8 (14.4), गडचिरोली 30.2 (14.6), गोंदिया 27.8 (14), नागपूर 28.8 (14.4), वर्धा 29 (14.9), वाशीम 30.2 (15.6), यवतमाळ 30.5 (16.5).

error: Content is protected !!